Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिवसभर मद्यधुंद, डिटेक्शन नाहीच, तोडपाणी करणारेच फोटोत पुढे!

दिवसभर मद्यधुंद, डिटेक्शन नाहीच, तोडपाणी करणारेच फोटोत पुढे!



सांगली : खरा पंचनामा

सांगलीत ठराविक शाखेत काम करणारे दिवसभर मद्यधुंद असतात कोणत्याही डिटेक्शनमध्ये यांचा सहभाग नसतोच. केवळ तोडपाणी करण्यासाठी त्या ठराविक शाखेत ही लोकं काम करतात. आतापर्यंत त्यांनी तोडपाणी करून कोट्यवधीची माया जमवली आहे. त्यांच्यावर डॉक्टर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सांगलीत ठराविक शाखेत नेमणुकीपासून काम करणारे अनेकजण आहेत. मुख्यालय आणि परिसरातच त्यांनी नोकरी केली आहे. भरती होऊन 15 वर्षांचा कालावधी झाला तरी काही लोक सांगलीच्या बाहेर गेलेच नाहीत. एखाद्या खमक्या अधिकाऱ्याने बदली केली तर प्रत्येकवेळी राजकिय दबाव आणून सांगलीत राहण्यात ते यशस्वी होत आहेत. असे असूनही त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असे तेच खासगीत (बारमध्ये) बोलतात. अशा लोकांवर कारवाई कोण करणार असे आता त्रस्त लोक विचारत आहेत.

पहिली पोस्टिंगच मलई मिळणाऱ्या विभागात झाल्याने हे चटावले आहेत. अनेकदा बदली होऊनही प्रतिनियुक्तीवर ते त्याच शाखेत परत येतात. अशांचा कायमचा बंदोबस्त कोण करणार? आलेल्या तक्रार अर्जात मिळवायचे कसे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय गुन्हेगारांना हाताशी धरून बेकायदा कामे करण्यातही हे लोक पटाईत आहेत. 

फक्त शहरात आणि त्या ठराविक शाखेत असल्याने यातील काहींनी शहरात आणि काहींनी स्वतःच्या तालुक्यात चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे यांना कायमचे त्या शाखेतून आणि सांगली, मिरज शहरापासून दूर पाठवणे गरजेचे आहे. अन्यथा सगळे बंद असूनही यांची कमाई सुरूच राहणार आहे. शिवाय डॉक्टरानी यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशीही करावी अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.