Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई विमानतळावर अडीच किलो कोकेन जप्त : डीआरआयची कारवाई

मुंबई विमानतळावर अडीच किलो कोकेन जप्त : डीआरआयची कारवाई 



मुंबई : खरा पंचनामा 

डीआरआयने मुंबई विमानतळावरून २.५८ किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला अटक केली. 

प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली असता, ट्रॉली बॅगमध्ये १२ साबण बारमध्ये ते लपवून ठेवलेले होते. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असे डीआरआयने म्हटले आहे. ज्या व्यक्तीला हे ड्रग डिलिव्हरी केले जात होते. त्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. यानंतर तो पकडलाही गेला. त्याच्या सहप्रवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याला डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

डीआरआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून मुंबईला येणारा एक भारतीय प्रवासी करोडो रुपयांचे कोकेन घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतरच डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सापळा रचून संशयित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १२ साबणाचे बार आढळून आले आणि ते फोडले असता प्रत्येक साबणाच्या आत ड्रग्ज लपवण्यात आले होते. त्याचे वजन केले असता ड्रग्ज २.५८ किलो असल्याचे आढळून आले. प्रवाशाने ते ट्रॉली बॅगमध्ये १२ साबणाच्या बारमध्ये लपवले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.