राज्य जीएसटीच्या तीन निरीक्षकांना बनावट छाप्या बद्दल केले बडतर्फ
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने मंगळवारी राज्य जीएसटीच्या तीन निरीक्षकांना एका व्यापाऱ्याकडून बनावट छाप्यात 11 लाख रुपये लुटल्याची स्पष्ट झाल्यानंतर बडतर्फ केले. राज्य प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची चर्चा आहे.
हितेश वसईकर, मच्छिंद्र कांगणे आणि प्रकाश शेगर अशी बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तिघांना तत्काळ प्रभावाने सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तिन्ही निरीक्षकांविरुद्ध पोलिसांचा तपास सुरू असून आमच्या बाजूने, आम्ही त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विभागाच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हितेश वसईकर, मच्छिंद्र कांगणे आणि प्रकाश शेगर या तीन जीएसटी निरीक्षकांनी एका व्यापाऱ्याच्या जागेवर बनावट छापा टाकला होता. त्यानंतर ते व्यापाऱ्याकडून 11 लाखांची खंडणी घेऊन निघून गेले होते .
एलटी मार्ग पोलिसांनी 17 सप्टेंबर 2021 रोजी तीन जीएसटी निरीक्षक आणि एका खाजगी व्यक्तीला फसवणूक आणि खंडणीसाठी अटक केली होती. तिन्ही निरीक्षकांनी 14 जून 2021 रोजी काळबादेवी येथील एका व्यावसायिकाच्या जागेची पाहणी केली होती.
ते व्यापारी लालचंद वाणीगोटा यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी स्वतःची जीएसटी निरीक्षक म्हणून ओळख करून दिली. मालकाला कार्यालयातील संपूर्ण रोकड
त्यांच्यासमोर टेबलावर ठेवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर 30 लाख रुपये ठेवले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वाणीगोटा यांच्याकडे जीएसटीची संबंधित कागदपत्रे मागितली आणि त्यानंतर जीएसटी जमा करण्यात येईल, असे सांगून त्याच्याकडून ११ लाख रुपये घेतले व निघुन गेले.
त्यानंतर वानीगोटा यांनी माझगाव येथील जीएसटी कार्यालय गाठले, परंतु तेथे छापा टाकला नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी एलटी मार्ग पोलिस स्टेशन गाठले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौघांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.