आमदार सदा सरवणकर यांना गोळीबारप्रकरणी क्लीन चिट!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रभादेवी परिसरात सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.
विशेष म्हणजे ती बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, मात्र गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचा पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सरवणकर यांना दिलासा मिळाला आहे. प्रभादेवी येथील मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती. या राड्यावेळी दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबाराची घटना घडली होती.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवाल आला. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले होते.
ती जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळत होते. मात्र पोलिसांनी सादर केलेल्या आवाहालात सरवणकर यांनी गोळी चालवली नसल्याचे सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.