Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीसह चार जिल्हा बँकांची एसआयटीमार्फत चौकशी!

सांगलीसह चार जिल्हा बँकांची एसआयटीमार्फत चौकशी!



मुंबई : खरा पंचनामा

विधिमंडळात आज सांगली, सातारा, चंद्रपूर, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील गैरव्यवहाराची चर्चा झाली. आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी या बँकांमधील गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणाच करून टाकली.

आमदार संजय सावकारे यांनी सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेत आमदार सुभाष देशमुख, राम सातपुते, प्रकाश आबीटकर, हरिभाऊ बागडे व अन्य एका आमदाराने भाग घेतला.
संजय सावकारे म्हणाले, सांगली जिल्हा बँकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत मांडले होते. त्यावर आता पहिल्यांदा उत्तर आलंय की सरकारने जानेवारी २०२३ मध्ये या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अजूनही सांगली जिल्हा बँकेची चौकशी झालेली नाही. चौकशीला दिरंगाई कशामुळे होत आहे. कोणत्या अधिकाऱ्यामुळे ही दिरंगाई होत आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि ती किती दिवसांत पूर्ण करणार, असा प्रश्न सावकारे यांनी उपस्थित केला होता.

त्यावर सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, आमदार मानसिंग नाईक व इतर नऊ जणांच्या तक्रारीवरून १४ सप्टेंबर २०२१ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पुणे सहकार त्यावर सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, आमदार मानसिंग नाईक व इतर नऊ जणांच्या तक्रारीवरून १४ सप्टेंबर २०२१ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पुणे सहकार आयुक्तांनी याबाबत समितीही नियुक्त केली होती. मात्र, सांगली जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब व्होनमोरे यांच्या विनंतीनुसार तत्कालीन सहकार मंत्र्यांच्या आदेशावरून स्थगिती देण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.