मंत्री पदाचा सट्टा लावून तो निर्णय घेतला : गुलाबराव पाटील
जळगाव : खरा पंचनामा
शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचं आपण त्यांना सांगितलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी जायचं तर जा असं सांगितल्यानं आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठा चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला. मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही तो निर्णय घेतला असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथील कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांना माझ्यामुळेच एक वर्ष जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. आज संजय पवारसुध्दा माझ्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्याचे पाटील म्हणाले. मी बोललो नसतो, अथवा आमच्या सात लोकांनी पाठींबा दिला नसता तर गुलाबराव देवकर हे अध्यक्ष झालेच नसते.
देवकर हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातले होते. आताचे अध्यक्ष संजय पवार हे सुध्दा जळगाव ग्रामीण मतदारसंघातले आहेत. सध्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाला चांगले दिवस असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
सात महिन्यात पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात आले, हा जोक नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला कुठेही सापडणार नाही. सकाळी पाच वाजेपर्यंत काम करतात, साधारण माणूस आहे, एकच ड्रेसमध्ये राहतात असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर गुलाबराव पाटलांनी स्तुतीसुमने उधळली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.