Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीचे तत्कालीन एसपी कृष्ण प्रकाश मुंबईतील फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक राज्यातील 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सांगलीचे तत्कालीन एसपी कृष्ण प्रकाश मुंबईतील फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक
राज्यातील 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या


मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 11 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. राज्याचे शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी मंगळवारी याबाबचे आदेश काढले आहेत. सांगलीचे तत्कालीन एसपी कृष्ण प्रकाश यांची मुंबईतील फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश कुमार मेकला यांची अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. मुंबईतील प्रशिक्षण व खास पथकेचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांना अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई येथे पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे नाशिक येथील संचालक राजेश कुमार यांना त्याच पदावर पद उन्नत करून पदस्थपना करण्यात आली आहे.

सांगलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई या पदावरून अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांची अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासनचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांची प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई येथे पदस्थपना करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले निखील गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. रविंद्र सिंघल अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

मुंबई फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह यांची अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त एस.टी. राठोड यांची अपर पोलीस आयुक्त,दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.