Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात चोरट्याकडून 2 मोपेड जप्त : राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापुरात चोरट्याकडून 2 मोपेड जप्त : राजारामपुरी पोलिसांची कारवाई 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या 2 मोपेड जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

रोहन फॉजदार सहानी (वय 34, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहन चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 

शनिवारी पथकाला राजाराम तलाव परिसरात एकजण चोरीची मोपेड विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून सहानी याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने टेंबलाईवाडी, प्रतिभानगर येथून दोन मोपेड चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या दोन्ही मोपेड जप्त करण्यात आल्या आहेत. 

पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमर आडूळकर, विशाल शिरगावकर, सत्यजित सावंत, संदीप सावंत, विशाल खराडे, अविनाश तारळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.