कोल्हापुरच्या एकाचे 25 किलोचे चांदीचे दागिने ट्रॅव्हल्समधून लंपास
सातारा : खरा पंचनामा
पुणे- बंगळूर महामार्गावरील भुईज - जोशीविहीर येथील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून 11 लाख 64 हजार रुपये किमतीचे 25 किलो चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना आज सोमवारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रघुनाथ चोपडे (रा. तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे कोंडुसकर कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून पुण्याला जावयाकडे निघाले होते. त्यांनी सोबत 25 किलो चांदीचे दागिने घेतले होते. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास चोपडे प्रवास करत असलेली ट्रॅव्हल्स नाश्त्यासाठी भुईज - जोशीविहीर येथील एका हॉटेलवर थांबली. ट्रॅव्हलमधील प्रवासी नाश्त्यासाठी खाली उतरले. यावेळी इतर प्रवाशांसोबत विजय चोपडे हे सुद्धा नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये गेले.
त्यावेळी त्यांनी चांदीचे दागिन्याची काळ्या रंगाची सॅक बसलेल्या खुर्ची शेजारीच ठेवली होती. प्रवाशांसोबत नाष्टा करून परत ट्रॅव्हल्समध्ये आल्यानंतर चोपडे यांना सीटवर सॅक आढळून आली नाही. चोपडे यांनी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांनी चौकशी केली. तसेच सॅकचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. सॅकमध्ये तब्बल 25 किलो चांदीचे लहान मुलांचे व महिलांचे पैंजण असे दागिने होते. याची किंमत 11 लाख 64 हजार आहे. या घटनेची नोंद भुईज पोलिसात झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.