राज्यातील ग्रामपंचायतीमधील 3666 जांगासाठीच्या पोटनिवडणुकीची घोषणा, 18 मे रोजी मतदान
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंयतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यासाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतमधील रिक्त जागांवर पोटनिवडणुका होणार आहे.
ग्रामपंचायतीमधील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुका होणार आहेत. त्यासाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज देण्यात आली.
निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
18 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.