Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत मोपेडच्या डिकीतून 3 लाखांची रोकड लंपास

सांगलीत मोपेडच्या डिकीतून 3 लाखांची रोकड लंपास



सांगली : खरा पंचनामा

शहरातील पुष्पराज चौकात भर दुपारी मोपेडची डिकी फोडून दोन लाख ९५ हजारांची रोकड लंपास केली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गोपालदास हिरालाल मुंदडा (वय ५८, रा. विश्रामबाग) यांनी फिर्याद दिली आहे. मुंदडा हे व्यापारी आहेत. ते विश्रामबाग परिसरातील सिद्धिविनायक नक्षत्र सदनिकेत कुटुंबासह राहतात. आज सकाळी त्यांनी दोन लाख ९५ हजारांची रोकड बँकेतून काढली होती. ती रक्कम त्यांची मोपेडच्या (एमएच १० बीसी २८५७) डिकीत ठेवली होती. चोरट्याने पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केला असावा असा पोलिसांना संशय आहे. 

मुंदडा हे दुपारी तीनच्या सुमारास पुष्पराज चौकातील एका बँकेशेजारी असणाऱ्या थंडपेय दुकानात गेले. त्यावेळी त्यांनी मोपेड तेथेच उभी केली होती. वर्दळीच्या ठिकाणी चोरट्याने मोपेडच्या डिकीचे लॉक तोडून त्यातील रोकड लंपास केली. दरम्यान, रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.