Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात 3 रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा

आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात 3 रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा





पुणे : खरा पंचनामा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी ऍड. तौसिफ शेख, ऍड. क्रांतीलाल सहाणे यांमार्फत मंगळवारी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला.

दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे. आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, अंधारे यांच्या वतीने मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी ऍड. तौसिफ शेख व ऍड. क्रांतीलाल सहाणे यांमार्फत मंगळवारी न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला.

त्यानुसार, दिवाणी दाव्यात न्यायालयामार्फत शिरसाट यांना नोटीस काढण्यात येईल. तर, फौजदारी दाव्यात त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश होतील अन्यथा त्यांविरोधात समन्स काढण्यात येतील, अशी माहिती अंधारे यांचे वकील ऍड. शेख व ऍड. सहाणे यांनी दिली. याखेरीज, ऍड. दीपक गायकवाड, ऍड. स्वप्नील गिरमे, ऍड. महेश गवळी यांनी याप्रकरणात काम पाहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.