शिक्के मारण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांना अटक
सोलापूर : खरा पंचनामा
नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटकेची कारवाई केली आहे.
निरिक्षक संभाजी साहेबराव फडतरे, कॉन्स्टेबल प्रियंका बबन कुटे, सहायक दुय्यम निरीक्षक सिद्धाराम अंदेनप्पा बिराजदार असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून, त्याचे स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरमध्ये नवीन आर्थिक वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग येथून शिक्के मारून घेण्यासाठी विभागातील प्रियांका कुटे व बिराजदार यांनी स्वतःसाठी व साहेबांसाठी चार हजारांची लाचेची मागणी केली. निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून तीन हजार रुपये रक्कम कुटे यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानंतर गुरूवारी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये कुटे यांनी लाच रक्कम स्वीकारली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.