Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टँकरमधून पेट्रोल चोरी, 5 जणांना अटक : सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

टँकरमधून पेट्रोल चोरी, 5 जणांना अटक : सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त



पुणे : खरा पंचनामा

पेट्रोल कंपन्यांमधून पेट्रोल घेऊन ते काळ्या बाजारात विकण्यासाठी साठा करुन ठेवलेले चार टँकर हडपसर पोलिसांनी पकडले आहेत. त्यांच्याकडून २ कोटी २७ लाख ९९ हजार ९९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सुनिलकुमार प्राणनाथ यादव (वय २४, रा. हडपसर), दाजीराम लक्ष्मण काळेल (वय३७, रा. हडपसर), सचिन रामदास तांबे (वय ४०), शास्त्री कबलु सरोज (वय ४८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल रामदास तांबे (वय ३८, रा. हडपसर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर येथील एचपी ट्रमिनलमधून पेट्रोल, डिझेल घेऊन टँकर बाहेर पडतात. त्यानंतर वाटेत थांबून त्यातील काही लिटर पेट्रोल, डिझेल काढून घेऊन त्याचा काळा बाजारात विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना हडपसरमधील लक्ष्मी कॉलनीत चार टँकर थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून तेथील पाच जणांना अटक केली.

या टँकरमधील नॉबमध्ये असलेल्या फटीमध्ये पट्टी टाकून ते ४ लॉक पैकी एक लॉक दाबतात. त्याबरोबर टँकरच्या खाली पेट्रोल, डिझेल पडू लागते. ते खाली ट्रे ठेवून गोळा केले जाते. त्यानंतर ते काळा बाजारात विकले जाते. या चार टँकरमधून २९ हजार ५४० रुपयांचे पेट्रोल या टँकरमधून काढण्यात आलेले घटनास्थळी मिळून आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.