राज्यातील 58 तहसीलदार झाले प्रांताधिकारी : सांगलीतील चौघांचा समावेश
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील तब्बल 58 तहसीलदाराना प्रांताधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी याबाबचे आदेश सह सचिव डॉ. माधव वीर यांच्या सहीने काढले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 4 तहसीलदारांचा समावेश आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने यंदा शासकीय अधिकाऱ्यांच्या बदली, पदोन्नतीचे आदेश लवकरच काढले आहेत. मे महिन्यापूर्वी बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आल्याने अधिकाऱ्यांमध्ये फील गुड वातावरण आहे. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेले बदली, बढतीचे आदेश या सरकारने काढल्याने सरकारी बाबू खुश आहेत.
या पदोन्नतीमध्ये सांगली जिल्ह्यातील दगडू कुंभार, किशोर घाडगे, रणजित देसाई, राजेंद्र पोळ या तहसीलदारांचा समावेश आहे.
दरम्यान सरकार पडणार की राहणार याची चिंता सतावत असतानाच यावर्षी वेळेत बदली, बढतीचे आदेश होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.