5 हजारांची लाच घेतांना पाटबंधारेच्या मोजणीदाराला रंगेहात पकडले
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील लघु पाटबंधारे विभागाच्या मोजणीदाराला पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ही कारवाई केली.
सागर गुणवंत गोळे (वय ३६) असे अटक केलेल्या मोजणीदाराचे नाव आहे. ताम्रपर्णी नदीतून शेतीसाठी रितसर पाणी उपसा परवाना मिळविण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. तो मंजूर करण्यासाठी गोळे याने 8 हजार पाचशे रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 5 हजारांची लाच मागितली. त्यातील 3 हजार रुपये तक्रारदाराने आधीच दिले होते.
त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर सोमवारी उर्वरित रक्कम स्वीकारताना गोळे याला रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक निरीक्षक संजीव बंबरगेकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे, सुधीर पाटील, सचिन पाटील, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.