Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



मुंबई : खरा पंचनामा

पूर्वलक्षी प्रभावाने जुन्या पेन्शन योजनेचे लाभ आणि सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अधिकारी महासंघाने दिली.

जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी या मागणीसाठी अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीसमोर अधिकारी महासंघाला बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी व वेळ देण्याच्या सूचना संबंधितांना कराव्यात, अशी विनंती या बैठकीत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. 

सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे करण्याबाबत देखील अधिकारी महासंघाने बैठकीत भूमिका मांडली. त्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले, अशी माहिती अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.