Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेल्वे प्रवाशांना लुटणारे 6 पोलिस निलंबित

रेल्वे प्रवाशांना लुटणारे 6 पोलिस निलंबित



पुणे : खरा पंचनामा

येथील रेल्वे स्थानकावर साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पोलिस हवालदार सुनील व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल , युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रेय गोसावी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांकडे प्रवाशांचे साहित्य तपासण्याचे काम होते. त्यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी एका तरुणासह त्याच्या मैत्रिणीला अडवले. बॅगेत गांजा असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. या दोघांना लोहमार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर हजर केले. त्याची नोंद स्टेशन डायरीत करून त्यांना सायंकाळी सोडून दिले.

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेतले, अशी माहिती मुंबईच्या लोहमार्ग पोलिस महासंचालक कार्यालयातून पुणे लोहमार्गचे प्रभारी पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळविली. बनसोडे यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना दिले. त्यानुसार रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चौकशीनंतर बनसोडे यांनी या सहा कर्मचाऱ्यांवर बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्याचे आदेश दिले. 

यापैकी एकावर प्रवाशांचे साहित्य तपासणीत गैरप्रकार केल्यामुळे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तरीही त्याची रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.