राज्यातील 78 नायब तहसीलदाराना पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पदोन्नती आणि बदल्यांचा धडाका लावला आहे. गुरुवारी राज्यातील तब्बल 78 नायब तहसीलदारांना तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बंड, सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील लागणारा निकाल या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने बदल्या आणि पदोन्नतीचा लावलेला धडाका सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एप्रिल अखेरीपर्यंत बहुतांशी बदल्या तसेच पदोन्नती होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान महसूल विभागातील पदोन्नतीमुळे सरकारी बाबू या राज्य सरकारवर खुश असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.