Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील 800 पोलिस अधिकारी, अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर सांगलीतील दोघांचा समावेश

महाराष्ट्रातील 800 पोलिस अधिकारी, अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर
सांगलीतील दोघांचा समावेश



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र पोलिस दलातील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक अथवा पोलिस पदक व पोलिस शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येते. यंदा राज्य पोलिस दलातील तब्बल 800 पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील संजय तुळशीराम संकपाळ आणि मुदस्सर अब्दुलकय्यूम पाथरवट असे पदक जाहीर झालेल्या अंमलदारांची नावे आहेत. पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी या पदकाबाबतची घोषणा बुधवारी केली.

पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. संजय संकपाळ यांनी मिरज शहर, सांगली शहर, विश्रामबाग, कवठेमहांकाळ आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केले असून सध्या ते पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. तर पाथरवट यांनी इस्लामपूर, विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, संजयनगर येथे काम केले असून सध्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात ते कार्यरत आहेत. सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दोघांचेही अभिनंदन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.