राज्य उत्पादन शुल्कच्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांसह 8 जणांच्या बदल्या
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर येथे गोवा बनावटीच्या दारू प्रकरणात राज्य उत्पादन शुल्कने मोठी कारवाई केली आहे. याबाबत संबंधित सहायक दुय्यम निरीक्षक, जवानांविरोधात वरीष्ठ अधिकाऱ्यांसह शासनाकडे अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेत एक्साईजचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी या प्रकरणाशी संबंधित चार वादग्रस्त कमर्चाऱ्यांसह आठ जणांच्या बदल्या केल्या आहेत.
इस्लामपूर निरीक्षक कार्यालयाकडील सहायक दुय्यम निरीक्षक उदय पुजारी यांची चिखलीतील विश्वासराव नाईक साखर कारखान्याकडे बदली करण्यात आली आहे. तर सहायक दुय्यम निरीक्षक आय. एम. शेख यांची विश्वासराव नाईक कारखान्याकडून इस्लामपूर निरीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली आहे. तर इस्लामपूर कार्यालयातील जवान संतोष वेदे यांची नाईक कारखान्याकडे बदली करण्यात आली आहे. जवान राकेश बनसोडे यांची इस्लामपूरहून सोनहिरा साखर कारखान्याकडे बदली करण्यात आली आहे.
शिराळा कार्यालयाकडील जवान सचिन जाधव यांची विराज अल्कोहोल कारखान्याकडे बदली करण्यात आली आहे. संगीता माळकोटी यांची विश्वासराव नाईक कारखान्याकडून इस्लामपूर कार्यालयाकडे बदली करण्यात आली आहे. अमित पाटील यांची विराज अल्कोहोल कारखान्यातून शिराळा कार्यालयाकडे बदली करण्यात आली आहे. माणगंगा साखर कारखान्याकडील जवान प्रमोद सुतार यांची इस्लामपूर कार्यालयाकडे बदली करण्यात आली आहे.
किरकोळ कारवाई
गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई करणारे इस्लामपूर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात अटक केलेल्या दोघांनी प्रातर्विधीचा बहाणा करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून पलायन केले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. पोलिस विभागात अशी घटना घडल्यास संबंधितांना निलंबित केले जाते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने केवळ त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून किरकोळ कारवाई केल्याची चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.