Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

8 हजारांची लाच घेताना महिला परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक, हवालदार जाळ्यात

8 हजारांची लाच घेताना महिला परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक, हवालदार जाळ्यात



अहमदनगर : खरा पंचनामा

जामिन लवकर मिळण्याकरिता मदत करू, तसेच न्यायालयाने म्हणणे मागितल्यावर लवकर देऊ असे सांगून 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून हवालदाराकरवी लाच स्विकारल्याप्रकरणी परिविक्षाधीन महिला पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक ज्योती मच्छिन्द्र डोके (26, नेमणुक - एमआयडीसी पोलिस स्टेशन, अहमदनगर. मुळ रा. मु. पो. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर. सध्या रा. दुध डेरी चौक, दत्त मंदिराजवळ, वडगाव गुप्ता शिवार, अहमदनगर) आणि पोलिस हवालदार संदीप रावसाहेब खेंगट (46, नेमणुक एमआयडीसी पोलिस स्टेशन, अहमदनगर, र बाभुर्डी बेंद, नगर-दौंड रोड, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मुलाविरूध्द अहमदनगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल आहेत. दाखल गुन्हयात त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे. त्याला लवकर जामीन मिळण्याकरिता मदत करू व न्यायालयाने म्हणणे मागितल्यावर लवकर देऊ असे सांगुन पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके आणि पोलिस हवालदार संदीप खेंगट यांनी दि. 11 एप्रिल रोजी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. 

लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 13 एप्रिल रोजी पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिस हवालदार संदीप खेंगट यांनी तक्रारदार यांच्याकडून सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेतली. दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.