संजय राऊत धमकीप्रकरण : पुण्यातून एक ताब्यात
पुणे : खरा पंचनामा
शिवसेना खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी पुणे पोलिसांनी काल रात्री उशीरा एकाला ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिस तत्काळ अलर्ट झाले. या मागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढण्यासाठी वेगाने तपास सुरु आहे.
मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. मुंबईतील गुन्हे शाखेच्या मदतीने पुणे पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी काल रात्री उशीरा एकाला ताब्यात घेतलंय. या संशयिताला घेऊन मुंबई पोलिस पुण्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. ताब्यात घेतलेला तरुण 23 वर्षांचा आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच सदर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
राहुल तळेकर याला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुण्यातील खराडी भागात पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत लगोलग या तरुणाला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. मुंबई पोलीस या तरुणाला घेऊन रात्रीच रवाना झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.