Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील ईडी कार्यालयात दाखल

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील ईडी कार्यालयात दाखल



कोल्हापूर : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची मागील वर्षभरापासून सीबीआय व 'ईडी'कडून वारंवार चौकशी केली जात आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स फसवणूक प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत १०८ जणांनी तक्रारी केल्या आहेत. आता साखर कारखान्यातील या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीने त्यांना फेब्रुवारी महिन्यात समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. आता त्यांची चौकशी केली जात असल्याचे ईडीने म्हटले आहे.

आमदार पी. एन. पाटील कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत. ते आज मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर झाले होते. पण त्यांची आज चौकशी झाली नाही. त्यांना नव्याने समन्स बजावून चौकशीसाठी बोलण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या व भागीदार असलेल्या व्यक्तींच्या घरावर गेल्या सोमवारी सकाळी पुण्यात ईडीने छापे टाकले होते. यात सॅलिसबरी पार्क, गणेश पेठ, नवी पेठ, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण नऊ ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.