सांगलीतील पहिला मराठा प्रिमीयर लीग चषक 'सिंहगड'ने पटकावला
सांगली : खरा पंचनामा
सकल मराठा समाजाच्यावतीने सांगलीत प्रथमच आयोजित मराठा प्रिमियर लिग या हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत सिंहगड संघाने अजिंक्यतारा संघाचा पराभव करत चषकावर नाव कोरले. विजेत्या संघाचे मालक मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई व दीपक पाटील आहेत.
तरुण भारत क्रीडांगणावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटातून राजगड, रामशेज, सुवर्णदुर्ग, सिंहगड हे चार संघ तर ब गटातून तोरणा, पन्हाळा, शिवनेरी, अजिंक्यतारा हे चार संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले होते. रविवारी उपांत्य फेरीत अजिंक्यतारा संघाने पन्हाळा संघाचा 10 विकेटनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसर्या उपांत्य सामन्यात सिंहगडने सुवर्णदुर्गचा 43 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेत जगन्नाथ अहीर (251 धावा, 19 बळी, 3 झेल, 5 धावबाद, 3 यष्टीचीत) यांनी मालिकाविर, पृथ्वीराज चव्हाण (204 धावा) सर्वोत्कृष्ट फलंदाज, अक्षय ताटे (18 बळी) उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला.
रविवारी रात्री संघमालक संजय सावंत यांच्या अजिंक्यतारा व विलास देसाई, दीपक पाटील यांच्या सिंहगड संघात अंतिम सामना सुरु झाला. अजिंक्यताराने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात सात बाद 63 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या सिंहगडने एका गड्याच्या मोबदल्यात 6.3 षटकात लक्ष्य गाठून पहिल्या चषकावर नाव कोरले. स्पर्धेत सुवर्णदुर्ग संघाने तिसरा तर पन्हाळा संघाने चौथा क्रमांक मिळवला.
स्पर्धेचा अंतिम दिवस आणि रविवारची सुटी यामुळे क्रीडांगण खचाखच भरले होते. 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सामने पाहण्यासाठी अनेकजण सहकुटुंब आले होते.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघास 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दीड लाख, तृतीय व चतुर्थ क्रमांकचे बक्षीस हे 50 हजार रुपये बक्षिस दिले. सहभागी संघानाही चषक दिले.
मराठा समाज अध्यक्ष अभिजीत पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गौतम पवार, नगरसेवक मंगेश चव्हाण, युवराज बावडेकर, मयूर पाटील, रणजित सावर्डेकर , विजय साळुंखे, शीतल बाबर, शरद देशमुख, पैलवान छोटू सावर्डेकर, जयवंत सावंत, रविंद्र खराडे, सतीश जगदाळे, ऋषिकेश खराडे, अरुण बाबर, दिगंबर जाधव, अजय देशमुख, सतोष भोसले आदींनी स्पर्धेचे नेटके संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.