Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एप्रिल अखेरपर्यंत सांगली पोलिसांचे बदली गॅझेट शक्य!

एप्रिल अखेरपर्यंत सांगली पोलिसांचे बदली गॅझेट शक्य!



सांगली : खरा पंचनामा

एप्रिल महिना सुरू होताच सर्वच शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागतात. यावर्षी पहिल्यांदाच सांगली पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे गॅझेट या महिना अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांची चलाखी ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

गेल्या तीन वर्षांपासून कोरोना, सत्तेतील उलथापालथ यामुळे शासकीय स्तरावरील बदल्यांमध्ये विस्कळीतपणा आला होता. यावर्षी मात्र पूर्वीप्रमाणे एप्रिल, मे तसेच जून महिन्यात नियमित बदल्या होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कार्यकाल पूर्ण झालेल्या तसेच विनंतीवरून बदल्यांसाठी इच्छुक असलेल्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात यावर्षी या बदल्या वेळेत होण्याचे संकेत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी त्यासाठी पावले उचलली आहेत. यावर्षी पोलिस कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे गॅझेट वेळेत होणार आहे. विनंतीवरून बदल्यांसाठी दि. 10 एप्रिलपर्यंत इच्छूकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर महिनाखेरपर्यंत प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांचा विचार करून त्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. 

डॉक्टरनी दिले जालीम इंजेक्शन!
यापूर्वी मे अखेरिस बदल्या होत होत्या. बदल्या झाल्यावर संबंधित जुलैमध्ये बदलीच्या ठिकाणी हजर होत होते. त्याचा फायदा संबंधितांना होत होता. कर्मचाऱ्यांची ही शक्कल ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिवाय दि. 10 मे पर्यंत बदली करण्यात आलेल्या प्रत्येकाने बदलीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक केल्याचेही समजते. त्यामुळे यावर्षी डॉक्टरानी जालीम इंजेक्शन दिल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.