Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला पोलिस अधिकारी घरात सापडली मृतावस्थेत!

महिला पोलिस अधिकारी घरात सापडली मृतावस्थेत!



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील कुर्ला येथील कामगार नगरमध्ये एक महिला पोलीस अधिकारी मृतावस्थेत आढळली. कामगार नगरमधील शरद सोसायटीमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसाह हा नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे.

शीतल येडके असं मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस ठाण्यात त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. परंतु मागील दीड वर्षांपासून त्या आजारी रजेवर होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे.

कामगार नगरमधील शरद सोसायटीलमधील पाचव्या मजल्यावर शीतल येडके यांचा फ्लॅट होता. मागील दोन दिवसांपासून पीएसआयच्या येडके यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली. नेहरुनगर पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शीतल येडके या मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवस आधी झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करण्यासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.