Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या पोलिस पत्नीचा मृत्यू!

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या पोलिस पत्नीचा मृत्यू!



पुणे : खरा पंचनामा

मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसपत्नी संगीता डवरे यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 

संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई करा, अशी तक्रार संगीता यांनी केली होती. मात्र या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी थेट मंत्रायलासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यावेळी पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीच्या वेळी भरधाव कारने थेट बॅरिगेट्स तोडले होते. याच भरधाव गाडीखाली संगीता यांचे पती चिरडले गेले होते. या भीषण अपघातात संगीता यांचे पती गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल होती. कार चालक हा मद्यप्राशन करुन होता. त्यामुळे कारचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी होती. मात्र त्याप्रमाणे कारचालकावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही.

नेरुळ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात गंभीरता दाखवली नाही आणि कारचालकाला सोडून दिलं. संगीता यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करा यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारल्या. त्यांनी या प्रकरणावर फार लक्ष दिलं नाही त्यानंतर संगीता यांनी राज्य सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पती काम करत असलेल्या पोलीस विभागाकडूनच न्याय मिळत नाही हे पाहून त्यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यालाही सरकारने गंभीर घेतलं नाही. त्यामुळे अखेर त्यांनी मंत्र्यालयासमोर जाऊन विषप्राशन केलं होतं. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.