Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस निरीक्षक ठार!

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस निरीक्षक ठार!



मुंबई : खरा पंचनामा

भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी सांताक्रूझ परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली आहे.

प्रविण अशोक दिनकर असे अपघातात ठार झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ते मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याकडे सांताक्रूझ परिसरातील पश्चिम द्रुतगती महार्गावरून जात होते. त्यावेळी भरधाव बसने त्यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस निरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बसच्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रविण अशोक दिनकर यांचे अपघाती निधन झाल्याने पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.