राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिर पत्रकातून अजितदादांचे नाव गायब!
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. अजित पवार बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेला पुर्णविराम दिला. दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या शिबीर पत्रकात अजित पवारांच नावं नसल्याने. पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
शिबीराच्या पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सदर शिबीराचे उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येईल. तसेच, खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत व राजकीय वक्ते यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने हे शिबीर पुढे कार्यरत होणार आहे. मात्र, यासर्वात अजित पवारांचे नाव वगळल्याने पुन्हा राज्यात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.