Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील चार पोलिस निरीक्षकांना उपाधीक्षकपदी पदोन्नती आयपीएस संदीप बिष्णोई यांची बदली

राज्यातील चार पोलिस निरीक्षकांना उपाधीक्षकपदी पदोन्नती
आयपीएस संदीप बिष्णोई यांची बदली



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या अस्थिर आहे. तरीही शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांचा धडाका लावला आहे. गुरुवारी राज्यातील चार पोलिस निरीक्षकांना उपाधीक्षकपदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. तर न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक आयपीएस अधिकारी संदीप बिष्णोई यांची महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. 

राज्यातील चार पोलिस निरीक्षकांना पोलिस उपाधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. निरीक्षक सुनील तेलुरे यांची नाशीक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर निरीक्षक आनंदा मुळे यांची बृहन्मुंबईचे सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक चंद्रकांत निंबाळकर यांची पुणे शहरच्या सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर निरीक्षक मनजीतसिंह बग्गा यांची नाशिक शहरचे सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

शेकडो निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत 
गृह विभागाने १७५ निरीक्षकांच्या संवर्गाचे आदेश दिले होते. त्यातील १२ जणांनी त्याला नकार दिला होता. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यातील सुमारे १६३ निरीक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात या अधिकाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी नेमणुकीसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी हिवाळी अधिवेशनाचे कारण सांगत त्यांची पदोन्नती शासनाने टाळली होती. निरीक्षक म्हणून दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पोलिस उपअधीक्षक अथवा सहायक आयुक्तपदी वर्णी लागणे आवश्यक होते. यातील काही अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. उर्वरित अधिकारी मात्र पदोन्नतीच्या आदेशाकडे डोळे लावून बसले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.