मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत गोंधळ : चंद्रकांत पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गोंधळ झाल्याचं दिसुन आलं. मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही लोक नाराज असल्यामुळे त्यांनी बैठकीत गोंधळ घालायचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी करण्यात आली.
चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी सर्व समन्वयकांनी केली. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला आहे.
मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, पाटील यांना त्याची उत्तरे देता आली नाहीत, असे सांगण्यात आले.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक अंकुश कदम म्हणाले, चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच समितीच्या बैठकीमध्ये गोंधळाचा वातावरण दिसुन आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.