जतमध्ये धारदार शस्त्राने वार करून तरूणाचा निर्घृण खून
सांगली : खरा पंचनामा
जत-अथणी रस्त्यावरील यल्लमा देवी मंदिराजवळ असलेल्या एका विहरीजवळ तरूणाचा मृतदेह रविवारी पहाटे आढळून आला. त्याच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार केलेल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्री तो तीन मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्याच्या त्या मित्रांवर पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.
खुनाची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान त्याच्यावर कोणी हल्ला केला तसेच खुनामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
सचिन ऊर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. सचिन यल्लमा मंदिराजवळील मदने वस्ती येथे रहात होता. तो चालक म्हणून काम करत होता. काल रात्री तो घरातून काम असल्याचे सांगून निघून गेला होता. रात्रभर तो घरी परतला नव्हता. रविवारी पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना यल्लमा मंदिर परिसरात असलेल्या विहिरीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती ग्रामस्थांनी तातडीने जत पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर सचिन याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान सचिन याला दारूचे व्यसन होते. त्याचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून एलसीबीचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान त्याच्यावर हल्ला किती लोकांनी केला याबाबत अजून कोणतीही माहिती हाती आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.