Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'इन्कम टॅक्स'कडून ४४ हजार कोटींचा दरोडा : राजू शेट्टी


'इन्कम टॅक्स'कडून ४४ हजार कोटींचा दरोडा : राजू शेट्टी


कोल्हापूर : खरा पंचनामा

इन्कम टॅक्स विभागाने देशातील ४४ कोटीहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी १ हजार रूपयाचा जिझिया कर आकारला आहे. यामुळे इन्कम टॅक्स विभागाने देशातील जनतेवर ४४ हजार कोटींचा दरोडा टाकला आहे, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

शेट्टी यांनी याबाबतचा व्हिडिओ माध्यमांना पाठवला आहे. त्यामध्ये शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास १ हजार रूपये खर्च येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल ४४ हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेला आहे.

केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी  करून  वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे  कंबरडे मोडले आहे. यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याकरिता रविवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटर , फेसबुक, इन्स्टांग्रामच्या माध्यमातून  पाठवायचा आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेल वरती सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.