Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोझिकोड रेल्वे जळीत कांडप्रकरणी रत्नागिरीतून एकाला अटक

कोझिकोड रेल्वे जळीत कांडप्रकरणी रत्नागिरीतून एकाला अटक



रत्नागिरी : खरा पंचनामा

केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या रेल्वेतील जळीत कांडप्रकरणी एकाला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएने संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये जळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला होता. 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पोलिसांना एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. केरळ पोलिसांचे एक पथकही रत्नागिरीत पोहोचले असून, आरोपीला लवकरच त्यांच्या ताब्यात दिले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.

कोझिकोड रेल्वे जळीत कांड प्रकरणातील संशयित शाहरुख सैफी याला केरळ पोलिसांच्या ताब्यात दिली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेवर बोलताना, हा भयंकर गुन्हा करणाऱ्याला महाराष्ट्रातील रत्नागिरीत अटक करण्यात आली आहे. मी महाराष्ट्र सरकार, पोलिस आरपीएफ जवान आणि एनआयएचे आभार मानत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या रेल्वेत रविवारी  रात्री एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले. यामुळे अलप्पुझा - कन्नूर एक्स्प्रेस रेल्वेच्या D1 डब्यात आग लागल्याने ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे रुळावर एक बॅगही सापडली असून, ही बॅग आरोपींची आहे का? की यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. हा दहशतवादी कट देखील असू शकतो, असा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या तरी या घटनेला माओवादी किंवा दहशतवादी बाजू असू शकते, हे नाकारू शकत नसल्याचा संशय केरळचे पोलीस महासंचालक अनिल कांत यांनी व्यक्त केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.