Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इचलकरंजीतील व्यापाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न

इचलकरंजीतील व्यापाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न



इचलकरंजी : खरा पंचनामा

इचलकरंजी येथील हातकणंगले रस्त्यावरील डेक्कन चौकात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एका व्यापाऱ्यावर हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. जखमी व्यापारी त्यांच्या दुकानात बसले होते. त्यांना दुकानातून बाहेर बोलावून हल्ला करण्यात आला.

आनंदा मारुती मस्के (वय 45) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर व पोटात चाकूचे वर्मी घाव घातले. पोटात केलेल्या वारा मध्ये चाकूचा दांडा तुटून पडला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. आनंदा मस्के यांना इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

एक महिन्यापूर्वीच डेक्कन चौकातील आनंदा मस्के यांच्या दुकानात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी दहशत माजवली होती. तसेच दुकानाच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. तेव्हापासून डेक्कन चौकात दहशतीचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर आज मस्के यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने इचलकरंजी शहर, शहापूर गावात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.