महा ई सेवा केंद्रात चोरी करणाऱ्या दोघांना अटक : जत पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जत शहरातील महा ई सेवा केंद्र तसेच अन्य दोन ठिकाणी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एक अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एलईडी, मॉनिटर, की बोर्ड, माऊस, स्पीकर असा 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली.
लक्ष्मण ऊर्फ लखन बाळू बामणे (वय 21, रा. विठ्ठलनगर, जत), विनायक गंगाराम मासाळ (वय 19, रा. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीतील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी एक पथक तयार केले होते.
जत येथील महा ई सेवा केंद्रात वरील संशयितांनी चोरी केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांच्या घरी छापा मारून झडती घेतली. त्यावेळी एलईडी, मॉनिटर, की बोर्ड, माऊस, स्पीकर यासह अन्य वस्तू सापडल्या. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश संकपाळ, अविनाश सागर, सुनील गडदे, संतोष माने, संतोष कुंभार, विशाल बिले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.