तसे झाल्यास आम्ही कॉंग्रेससोबत जाऊ! शिंदे गटाचा सूचक इशारा
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे धाराशिवमध्ये भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजपच्या हालचालींना शिंदे गटाने सूचक इशारा दिला असल्याच्या चर्चेने उधाणं आलं आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नेहमीत त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक अट घातली आहे. आम्ही काँग्रेस सोबत युती करण्यास तयार, असं धक्कादायक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले.
त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. असे सांगत भाजपच्या हालचालींना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील इशारा दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.