आमदार हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्जाच्या निकालापर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण होते. मात्र ते संरक्षण आता संपले आहे. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील व्यावसायिकांवर ईडीने छापेमारी देखील केली होती. ईडीने पुणे शहरातील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. हडपसरला, गणेशपेठ, प्रभात रोड, सिंहगड रोड आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
नलावडे साखर कारखाना प्रकरणी 11 मार्च रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. मागील दोन महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती. सकाळी सात वाजता ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.