अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही : पोस्टरबाजी हास्यास्पद
सांगली : खरा पंचनामा
राज्यात अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री पोस्टर लावले जातात हे हस्यस्पद आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे, असे अनेक जणांची इच्छा आहे. मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते पण जो पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. त्यांचं काम चांगले आहे, असे प्रशस्तीपत्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले.
ना. आठवले शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत नेते आहेत पण एकनाथ शिंदे यांच्या बद्दल वक्तव्य केले ते योग्य नाही. त्यांनी शिंदे यांच्यासह त्या 40 आमदारांवर आगपाखड सुरू केले आहे. ते सध्या शरद पवारांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे ते तसे बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयात निर्णय शिंदे यांच्या बाजूने लागेल असा मला विश्वास आहे.
मुख्यमंत्री पदाच्या पोस्टरबाजीवर ते म्हणाले, आता सगळ्या लोकांना मुख्यमंत्री व्हावे वाटते मग मला पण मुख्यमंत्री व्हावे वाटते. मी इच्छुक आहे पण आपली ज्यावेळी ताकत असेल, आमदारांचे संख्याबळ असेल त्यावेळी हे शक्य आहे. सध्या तरी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळेल असे वाटत नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले.
सध्या तरी राज्यातील आमचे सरकार स्थिर आहे. 2024 मध्ये आमचे सरकार निवडून येईल यात शंका नाही. शरद पवार यांनी भाकरी फिरवायला पाहिजे. त्यांनी ठोस निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे काम चांगलेच आहे. दोघांपैकी एकाला पसंती देणे अवघड आहे. पण या दोघांच्या कामामुळेच 2024 ला आमच्या युतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.