सुदानमध्ये अडकलेल्या संगलीकरांना तातडीने मायदेशी आणा
जयंत पाटील यांचे ट्विटद्वारे परराष्ट्रमंत्र्यांना आवाहन
मुंबई : खरा पंचनामा
सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे ट्विटद्वारे केली आहे.
सुदानमध्ये सुरु असलेल्या देशातंर्गत यादवी युद्धामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे १२०० किलोमीटरवर हे नागरीक आहेत.
परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्र सरकारने यामध्ये विशेष लक्ष घालून सांगली जिल्ह्यातील नागरिकांची ऑपरेशन कावेरीद्वारे सुटका करावी असेही पाटील यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.