Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईव्हीएम नाही आता होणार बॅलेट पेपरवर मतदान!

ईव्हीएम नाही आता होणार बॅलेट पेपरवर मतदान! 



ढाका : वृत्तसंस्था 

देशात एकीकडे विरोधकांसह काही प्रमाणात सामान्य जनतेमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र आता शेजारच्याच देशात पुन्हा बॅलेट पेपवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

आता बांग्लादेशात पुन्हा एकादा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत. बांगलादेशच्या शेख हसीना यांच्या सरकारने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करण्याचे ठरवले आहे. शेख हसीना यांच्या सरकारने ईव्हीएम काढून टाकण्याची आणि बॅलेट पेपरद्वारे देशात लोकसभा निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी मान्य केली आहे. 

बांगलादेश निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या आगामी 12व्या संसदीय निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार नाहीत. बीएनपीसह प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरास जोरदार विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशात वर्षाच्या शेवटी निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार असून पुढील वर्षी जानेवारीत मतदान होणार आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएम रद्द करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, बांगलादेशात सर्वच मतदारसंघात ईव्हीएमचा वापर केला जाणार नाही. 

बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीसह प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे बांगलादेशातील सर्व 300 संसदीय मतदारसंघात मतपत्रिका आणि मतपेट्या वापरल्या जाणार आहेत. बांगलादेश निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे की, जुन्या कागदी मतपत्रिका परत आणल्याने लोकशाही मूल्ये बळकट होणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.