राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात विधानसभा निवडणूक लढवणार!
बंगळुरू : खरा पंचनामा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कर्नाटकात एकूण किती जागांवर लढणार ती आकडेवारी आणि उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी कर्नाटकात ९ जागा लढवणार आहे. उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. उत्तम पाटील, मन्सूर बिलागी, जमीर इनामदार, कुलप्पा चव्हाण, हरी आरआर शंकर, सुगुणा के., एस. वाय. एम. मसूद फौजदार, रेहाना बानो अशी उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार असून १३ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच २० एर्पिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवडणूक आयोगाने तेव्हा राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेसलाही धक्का देत राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. त्यामुळे आता राष्ट्रवादी अॅक्टिव मोडमध्ये आली असल्याचं चित्र आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.