Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल गांधी वक्तव्य प्रकरण : गुजरात उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार!

राहुल गांधी वक्तव्य प्रकरण : गुजरात उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार!



अहमदाबाद : खरा पंचनामा

सुरतच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने राहुल गांधी यांनी मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राहुल गांधी यांनी केली आहे. या याचिकेवर शनिवारी हायकोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी आता मंगळवार २ मे रोजी सुनावणी  होणार आहे.

राहुल गांधी हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांनी असे शब्द वापरू नयेत, असे गुजरात उच्च न्यायालयाने आज म्हटले आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत प्रच्छक म्हणाले, राहुल गांधी यांनी मर्यादेत राहून वक्तव्य करावे. ते मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांचे कर्तव्य आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी देखील युक्तिवादात आपली भूमिका मांडली. राहुल गांधी म्हणाले, मी कोणताही खून केला नाही. निवडणूक लढवण्यास ८ वर्षांची बंदी म्हणजे हा मोठा अतिरेक आहे. शिक्षेला स्थगिती द्यायची की नाही, याचा निर्णय न्यायालय आणि आरोपी यांच्यात आहे. तक्रारदाराचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे राहुल गांधी यांचे वकिल मनू सिंघवी यांनी स्पष्ट केले.

मोदी आडनावाबाबत मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरलेले राहुल गांधी यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी सुरत येथील सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २० एप्रिल रोजी गांधी यांची याचिका फेटाळली. सविस्तर आदेशात, सत्र न्यायालयाने गांधींच्या अपात्रतेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर गांधी यांनी गजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.