Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तक्रारदार, साक्षीदार फितूर होऊनही आरोपीस २५ वर्षे कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तक्रारदार, साक्षीदार फितूर होऊनही आरोपीस २५ वर्षे कारावासाची शिक्षा



सांगली : खरा पंचनामा

नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले. तिला मूलही झाले. याबाबत समाजसेवी संस्थेने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार संशयिताला अटक करण्यात आली. या खटल्यात तक्रारदार पीडित मुलगी, साक्षिदार असलेली तिची आई फितूर झाल्या. तरीही सांगली न्यायालयाने संशयितास दोषी धरून २५ वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ०१ वर्षाची सश्रम कैद सुनावण्यात आली. सांगली येथील जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. एस. हातरोटे यांनी आज हा निकाल दिला.

सद्दाम हुसेन शहा (वय ३२, रा. नेहरुनगर, कुपवाड रोजी, सांगली, ता. मिरज, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याकामी सरकापक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, पिडीत मुलगी ही आरोपीची अज्ञान नातेवाईक आहे. दोघे एका इमारतीमध्ये राहतात. २०२० मध्ये आरोपी पिडीतेच्या नात्याच्या कारणाने पिडीतेच्या घरी सतत जात होता. त्याने पिडीता हॉलमध्ये सोफासेटवर एकटीच बसली असताना तिला मिठी मारली आणि तिचे इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध केले. "तू कोणाला बोलू नकोस" असे तिला सांगितले. त्यानंतर पुन्हा दीड महिन्याने आरोपीने पिडीतेबरोबर पुन्हा शरीरसंबंध केले आणि अबू पोटी पिडीतेने कोणास त्याबाबतची त्वरित माहिती दिली नाही. 

पिडीतेस डिसेंबर २०२१ मध्ये दिवस गेल्यावर पोट वाढल आणि तिच्या पोटात दुखू लागले व पिडीतेने तिच्या आईस ही बाब सांगितली. त्यानंतर पिडीतेची सोनोग्राफी करण्यात आली. पिडीता ही गरोदर असल्याचे डॉक्टरने सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या आईने पिडीतेस धनश्याम नगर येथील कर्ण संस्थेत नेले व तेथील समाजसेविका यांनी ही बाब संबंधित पोलीस स्टेशनकडे कळविण्यास सांगितले. 

त्याप्रमाणे आरोपी सद्दाम शहा याचेविरुद्ध 09 डिसेंबर 2021 रोजी फिर्याद नोंदवण्यात आली. घटनेनंतर पिडीतेची प्रसूती झाली. त्यावेळी त्या अर्भकाचे DNA सॅम्पल घेण्यात आले. तसेच, पिडीता आणि आरोपी सद्दाम यांचे देखील DNA सॅम्पल घेण्यात आले. त्यानंतर तपासी अंमलदार यांनी सदरची DNA सॅम्पल तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळा यांचेकडे पाठवले व त्याचा अहवाल प्राप्त झाला त्यानुसार आरोपी हाच पिडीतेच्या अर्भकाचा जैविक पिता असल्याचे शाबित झाले. 

या खटल्यात पिडीता आणि तिची आई या दोघीही फितूर झाल्या आणि त्यांनी आरोपी दोषमुक्त होण्यासाठी त्यास मदत केली. फिर्यादी व साक्षीदार फितूर झाले असले तरी अन्य मार्गे आलेल्या पुराव्यावरून आरोपी यास न्यायालयाने दोषी धरून शिक्षा सुनावली.

तपास अंमलदार पोलिस उपनिरीक्षक महेश एम. डोंगरे यांनी देखील तपास योग्य रितीने केला व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. याकामी एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी न्यायवैद्यक प्रयोगशाळा यांचेकडील तज्ञ डॉक्टरांची साक्ष व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तक्रारदार आणि साक्षीदार जरी फितूर झाले तरी उपलब्ध पुराव्यावरुन आरोपी दोषी ठरु शकतो हेच या केसच्या निर्णयावरुन स्पष्ट झाले.

या खटल्यात संजयनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब काटकर, पैरवी कक्षातील श्री. राडे, गणेश वाघ, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले, सुनीता आवळे व सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलीसांचे सहकार्य मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.