मनोजकुमार लोहिया छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त
मुंबई : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांची बदली करण्यात आली असून नवीन पोलिस आयुक्त म्हणून मनोज कुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नियुक्तीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) येथे करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बृहमुंबईत अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डी. एस. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.