Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गँगस्टर अतिक अहमदसह भाऊ अस अश्रफचा गोळ्या घालून खून

गँगस्टर अतिक अहमदसह भाऊ अस अश्रफचा गोळ्या घालून खून



लखनौ : खरा पंचनामा

उत्तरप्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज येथे गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. वैद्यकीय चाचणीसाठी नेताना त्यांचा खून झाला. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.


अतिक अहमद 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातही प्रमुख आरोपी होता. यापूर्वी अतीकचा मुलगा असद अहमद 13 एप्रिल रोजी झाशीमध्ये एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता. त्यासोबत शूटर गुलामलाही यूपी एसटीएफने मारले होते.

अतिक अहमद आणि अश्रफ अहमद या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात असताना तीन लोक आले आणि त्यांनी त्यांचा गोळ्या घालून खून केला. या तीन हल्लेखोरांपैकी एकाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये खून, खंडणी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा आणि कुख्यात गँगस्टर असद अहमदचा एन्काऊंटर करण्यात आला होता. उमेश पाल खून प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. त्याच्यासोबत गुलाम नावाच्या शूटरचाही एन्काऊंटर करण्यात आला होता.

अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनाचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात दोघंही ठार झाले. या दोघांवरही पाच-पाच लाखांचं बक्षीस होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.