आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक होणार : मुख्यमंत्र्यांना दिला ईशारा
सोलापूर : खरा पंचनामा
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. तीही फेटाळण्यात आली. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाजाने आता थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेत मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देखील देण्यात आला आहे. आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही असा पवित्रा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज आक्रमक झाला आहे. सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या वतीने पंढरपुरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाची याचिका राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्यामुळेच फेटाळण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे.
समाजाच्या वतीने तुळजापूर ते मुंबईपर्यंत मोर्चा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत एल्गार पुकारणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.