हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना लुबाडणाऱ्या वकीलास अटक
पुणे : खरा पंचनामा
हनी ट्रॅपद्वारे अडकवून बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकांना लुबाडणाऱ्या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या वकिलाला अटक करण्यात आली आहे. शिवाय आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. विक्रम भाटे ( वय ३४, रा. हडपसर) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. तर वैभव शिंदे (वय ३४ ) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्कारची केस करण्याची धमकी देऊन अॅड. विक्रम भाटे याने १७ लाखांना लुबाडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या व्यावसायिकाच्या ओळखीच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाघोलीत जून २०२१ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.
फिर्यादी महिला व वैभव शिंदे, अॅड. विक्रम भाटे हे ओळखीचे आहेत. ते फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी कोल्ड्रींकमध्ये काही तरी मिसळून त्यांना आग्रह करुन पिण्यास दिले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी शारीरीक संबंध केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रण केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसऱ्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्याचे चित्रण करुन त्या व्यावसायिकांना लुबाडले. हडपसरमधील व्यावसायिकालाही असेच हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास फिर्यादीला सांगितले होते. परंतु, तिने तो ओळखीचा असल्याने नकार दिला. तेव्हा दुसऱ्या तरुणीची भाटे याने मदत घेतली होती. भाटे व इतर लोक अशा प्रकारे फसवणूक करीत असल्याचे तिने या व्यावसायिकाला सांगितल्यावर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भाटे याला अटक केली. त्यानंतर आता या तरुणीनेही आपल्यावर बलात्कार केल्याची फिर्याद दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.