संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाने डॉक्टर भावाचा चिरला गळा!
कुपवाड : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कुपवाड येथे संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाने डॉक्टर भावाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. कुपवाड येथील एका समाज मंदिर परिसरात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी तातडीने संशयित भावाला ताब्यात घेतले आहे. कुपवाड पोलीस अधिक तपास करत आहेत.
डॉ. अनिल बाबाजी वनखंडे (शिंदे) (वय 43) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संपत वनखंडे (शिंदे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान संपत याच्यावर गेल्या काही वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ. वनखंडे हे मुळचे कुपवाड वडगाव येथील आहेत. सध्या ते कुपवाड येथे प्रॅक्टिस करत होते. ते पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. तर त्यांचा भाऊ संपत बहिणीकडे रहात होता. तो अविवाहित आहे. त्याने भाऊ अनिल याच्याकडे संपतीतील वाटणीसाठी तगादा लावला होता. तू डॉक्टर असून स्थिरस्थावर झाला आहेस. मी एकटाच असल्याने मला संपतीमध्ये वाटणी दे असे संपत त्यांना वारंवार म्हणत होता.
बुधवारी सकाळी संपत याने भाऊ डॉ.
अनिल यांच्या घरात शिरून विळ्याने मानेवर वार करून निर्घृणपणे खून केला. नंतर त्यांच्या कुटूंबियांनी आरडाओरडा केला. नागरिक जमा झाले. खून करून निर्विकारपणे संपत रस्त्याने जात असताना कुपवाड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.